धुळ्यात कापूस खरेदी सुरू, पण पितृपक्षानंतर आणण्याचे आवाहन

अखेर धुळ्यात कापूस खरेदी सुरू झाली आहे. केशरानंद उद्योग समूहाच्या जीनिंग आणि ऑईल मिलच्या (Ginning and oil mill) विविध कामांचे उद्घाटन व कापूस (cotton) खरेदीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांनी सध्या पितृपक्ष असल्यामुळे पंधरा दिवसांनंतर कापूस आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. -


September 21, 2021 नाशिकः अखेर धुळ्यात कापूस खरेदी सुरू झाली आहे. केशरानंद उद्योग समूहाच्या जीनिंग आणि ऑईल मिलच्या (Ginning and oil mill) विविध कामांचे उद्घाटन व कापूस (cotton) खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांनी सध्या पितृपक्ष असल्यामुळे पंधरा दिवसांनंतर कापूस आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (Start buying cotton in Dhule)

बाम्हणे शिवारात केशरानंद जीनिंग व ऑईल मिल आहे. येथील स्टिमटेक कंपनी ड्रायरचे उदघाटन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांनी केले, तर कापूस खरेदीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे कार्यकारी संचालक अरुण उन्हाळे यांनी केला. कापूस साठवणूक आणि नवीन शेड जीनिंग काँक्रिटीकरणचे उद्घाटन तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते झाले. केशरानंद उद्योग समूहाच्या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांचा कापसाला चांगला भाव मिळाला असा आहे. या दृष्टीने कापूस शुभारंभाचा मुहूर्त होता. मात्र, सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी अजून पंधरा दिवस कापूस विक्रीसाठी आणू नये. घटस्थापनेनंतर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

नंदुरबारमध्येही शुभारंभ

नंदुरबारमधील खेतिया बाजार समितीनेही कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. येथे पहिल्या दिवळशी कापसाला क्विटंलमागे 6 हजार 520 रुपये भाव मिळाला. कापूस खरेदी सुरू झाली आहे असे समजताच बाजार समितीच्या प्रांगणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळाली. व्यपारी, शेतकरी, हमाप-मापाड्यांची सकाळपासून उपस्थिती होती. खेतिया बाजारपेठेची ख्याती सर्वदूर आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील शेतकरी येथे कापूस विक्रीसाठी गर्दी करतात. यामुळे येथील भाव आणि विक्रीकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात.

कापसाचे भाव वाढणार

सध्या जागतिक बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. कापसाच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ आहे. त्यामुळे येत्या काळात खासगी बाजारात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सध्या दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या काळात जोरदार पाऊस सुरू झाला, तर कापूस खरेदीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Start buying cotton in Dhule)


Share to ....: 369    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31663366

Saying...........
Men are neither suddenly rich nor suddenly good.





Cotton Group