कापसाचे उत्पादन घटूनही वाढले उत्पन्न, कशामुळे झाला हा चमत्कार? वाचा सविस्तर

सर्वकाही प्रतिकूल असताना वाढत्या दराने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. कापसाला यंदा हमीभावापेक्षा जवळपास दुपटीनेच दर मिळाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी दरात वाढ झाल्याने केलेला खर्च अन् चार पैसे शेतकऱ्यांना कापसातून मिळालेले आहे. -


January 22, 2022 मुंबई : (Kharif Season) खरीप हंगामातील कापसाचे पीक सध्या अंतिम टप्यात आहे. खरिपातील सर्वच पिकांची उत्पादनाची आणि प्रत्यक्षात पदरी पडलेल्या उत्पन्नाची कहाणी काही वेगळीच आहे. कारण यंदा अधिकच्या पावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. (Cotton Production) उत्पादनात निम्म्यानेच घट झाल्याने आता शेतकऱ्यांना मिळणार तरी काय असा सवाल उपस्थित होत होता. सर्वकाही प्रतिकूल असताना वाढत्या दराने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. (Cotton) कापसाला यंदा हमीभावापेक्षा जवळपास दुपटीनेच दर मिळाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी दरात वाढ झाल्याने केलेला खर्च अन् चार पैसे शेतकऱ्यांना कापसातून मिळालेले आहे. कापसाचा आधारभूत दर हा 5 हजार 925 रुपये असताना सध्या खुल्या बाजारपेठेत 10 हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. उत्पादन कमी झाले असले तरी खरेदी केंद्रावरील दर शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहिलेले आहेत.

वाढत्या किंमतीमुळे जे नुकसान पावसामुळे आणि बोंडअळीमुळे झाले होते ते भरुन निघत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरिपातील तूर, सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात घट झाली असली वाढीव दरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मात्र वाढ झाली आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच दरात वाढ
कापूस पीक अंतिम टप्प्यात असतानाच झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच पण काढणी सुरु असताना ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला परिणामी उत्पादनात तर घट झालीच पण उत्पादित झालेला मालही दर्जाहीन होता. मात्र, घटत्या उत्पादनामुळेच बाजारपेठेतली मागणी ही वाढत गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतही हीच अवस्था होती. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दिवसेंदिवस दर वाढतच गेले.

गेल्या 50 वर्षात जे दर कापसाला मिळाले नाहीत ते दर यंदा मिळालेले आहेत. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी मोहित शर्मा म्हणाले की, अजूनही कापसाच्या मागणीत वाढ ही कायम आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

निसर्गाची अवकृपा त्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव
सध्या कापासाचे दर हे आधारभूत किंमतीपेक्षा जवळपास दुपटीनेच आहेत. त्यामुळे हमीभाव केंद्रापेक्षा खासगी खरेदी केंद्रवरच शेतकरी कापसाची विक्री करीत आहेत. सध्या कापसाच्या गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. बाजारातील तज्ञांनी सांगितले की पिकांचा हंगाम आता जवळजवळ संपला आहे. गेल्या वर्षीच्या 22 लाख 76 हजार क्विंटलच्या तुलनेत सिरसा जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांमध्ये आतापर्यंत केवळ 16 लाख 36 हजार क्विंटल कापूस आला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावरच कमी क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. असे असताना सरासरीपेक्षा निम्म्याने उत्पादन घटले होते.

उत्पादन घटले म्हणजे पुरवठा कमी होणार त्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी योग्य दर मिळाल्याशिवाय कापूस विक्रीलाच काढला नाही परिणामी दरात दुपटीने वाढ झाली आहे. आता राज्यात 10 हजारापेक्षा अधिकचा दर मिळत आहे.


Share to ....: 346    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31667645

Saying...........
Men show their character best by the things they laugh at.





Cotton Group