एनटीसीला लागणार टाळे, बंद करण्याची प्रक्रिया सुरू; वस्त्रोद्योग मंत्रालयाचे पत्र

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ बंद करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा फटका महामंडळाच्या जमिनींवरील एनटीसीच्या लाखो कर्मचाऱ्यांना बसणार आहे. -


May 15, 2022 म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ अर्थात, एनटीसी बंद करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसे अधिकृत पत्र वस्त्रोद्योग मंत्रालयाने एनटीसीला पाठवले आहे. यामुळे महामंडळाच्या ताब्यात असलेल्या गिरण्यांच्या शेकडो एकर जमिनींवरील लाखो चाळकरी, दुकानदार, तसेच एनटीसीमधील कर्मचारी संभ्रमात व संकटात सापडले आहेत.
एनटीसीने १९७०च्या दशकात बंद पडलेल्या सूतगिरण्या कवडीमोल किंमतीने स्वत:च्या ताब्यात घेतल्या. त्यातील काही गिरण्या काही वर्षे सुरू होत्या. पण एनटीसी त्या चालवू शकली नाही. असे असले तरी या गिरण्यांच्या कोट्यवधींच्या जमिनींची मालकी एनटीसीकडे आहे. त्यावेळी गिरणीत काम करणारे कर्मचारी सहा ते आठ दशकांपासून या जमिनींवर उभारण्यात आलेल्या चाळीत राहतात. शेकडो दुकानदारही तेथे आहेत. या सर्व स्थितीत दुकानदारांना विविध कारणांखाली नोटीस बजावून जागेतून बेदखल केले जात आहे. अशीच योजना रहिवाशांसाठीसुद्धा आखण्यात आल्याचे एनटीसीतील अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. एनटीसी बंद करण्याची तयारी दिल्ली दरबारी सुरू झाली असल्यानेच असे केले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

यासंदर्भातील वस्त्रोद्योग मंत्रालयाचे एक पत्र 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हाती आले आहे. एनटीसी बंद करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक उद्योग विभागाला (डीपीई) १९ जानेवारीलाच प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने मागील दोन वर्षांचा ताळेबंद तत्काळ मंत्रालयाकडे पाठवावा. डीपीई या ताळेबंदाचा अभ्यास करून एनटीसी बंद करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र एनटीसीच्या मुंबई कार्यालयालाही पाठवण्यात आले असून, एनटीसी बंद करण्याची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या मौखिक सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे काय होणार?

अशाप्रकारे एनटीसी बंद होत असल्याने यातील सात हजार २०० कर्मचारीदेखील संकटात येणार आहेत. 'महामंडळ बंद होत असल्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना अन्य विभागांत सामावून घ्यावे. अन्यथा या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची वाताहात होईल', अशा आशयाचे पत्र एनटीसी कर्मचारी एम्प्लॉइज वेल्फेअर फोरमने केंद्र सरकारला लिहिले आहे. एनटीसी मुंबईतील प्रभारी महाव्यवस्थापक प्रताप नितनवरे हे या फोरमचे अध्यक्ष आहेत. एनटीसी बंद होऊ नये यासाठी लढा देण्याचा निर्णय फोरमने घेतला आहे.


Share to ....: 250    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31520300

Saying...........
Love does much but money does more.





Cotton Group