Cotton Seed Rate : जळगाव जिल्ह्यात कापसाच्या बियाण्यांचा तुटवडा असताना कृषी विभागाचा चालढकलपणा

शेतकऱ्यांची (farmer)मोठी कोंडी होत आहे. दरम्यान खतांच्या टंचाईसोबत आता कापूस (cotton seed) बियाण्यांचा काळाबाजार समोर आला आहे. -


June 16, 2022 जळगाव, 16 जून : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon district) मागच्या काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांमध्ये (Agricultural Service Centers) रासायनीक खतांचा तुटवडा (shortage of chemical fertilizers) असल्याने शेतकऱ्यांची (farmer)मोठी कोंडी होत आहे. दरम्यान खतांच्या टंचाईसोबत आता कापूस (cotton seed rate) बियाण्यांचा काळाबाजार समोर आला आहे. शेतकऱ्यांना जादा पैसे मोजून बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे. काही कापूस बियाणे पुरवठादार कंपन्यांनी (cotton seeds provide company) आपले बियाणे बाजारात पुरेसे पाठविले नाही. त्याची मागणी असल्याने तुटवडा तयार झाला. कंपनीकडे बियाणे साठा आहे, पण बाजारात तुटवडा आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या घाईत असताना नवे संकट समोर आल्याने शेतकऱ्यांची द्विदा अवस्था निर्माण झाली आहे.

यामुळे संबंधित बियाण्यांची जादा दरात विक्री काही कृषी केंद्रचालक विनापावती करीत असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज आहे. यात काही कंपन्यांच्या वाणांची अधिकची मागणी दरवर्षी असते. तसेच सरळ वाणांमध्येही एका कंपनीच्या वाणाची अधिक मागणी असते. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या बियाण्यांचा पुरवठा विस्कळीत झाला असल्याची माहिती दै. अॅग्रोवनने दिली आहे.

याचबरोबर काही कंपन्यांनी नफेखोरीसाठी हेतुपुरस्सर ही योजना आखल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याकडे कृषी विभागाने लक्ष न दिल्याने कापूस कंपन्यांची मनमानी सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हंगाम सुरू होताच या कंपन्यांच्या वाणांचा काळाबाजार सुरू झाला आहे. कृषी विभागाने या बाबत कृषी केंद्रांवर कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही. 750 रुपयांचे कापूस बियाणे एक पाकिट 1200 रुपयांत भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर भागांत शेतकऱ्यांना दिले जात आहे.

सरळ वाणांमध्ये एका कंपनीकडून फक्त दोन हजार पाकिटे कापूस बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. हा पुरवठा किमान 20 ते 25 हजार पाकिटे अपेक्षित आहे. कारण दरवर्षी संबंधित कंपनीच्या सरळ वाणाला मोठी मागणी आहे. परंतु हा अनुभव दुर्लक्षित करून कृषी विभाग आपले नियोजन, कारभार करीत आहे.

मध्य प्रदेश, गुजरातमधील अवैध देशी, 'बोलगार्ड 4' किंवा 'बोलगार्ड 5' (एचटीबीटी) कापूस बियाणे दाखल होत आहेत. परंतु त्याचीही बिनबोभाटपणे विक्री चोपडा, मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा, जामनेर आदी भागात सुरू आहे. यात शेतकऱ्यांची मात्र मोठी फसवणूक, आणि वित्तीय लूट सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कृषी विभागाचा चालढकलपणा

जिल्ह्यात फक्त 'बोलगार्ड 2' प्रकारातील कापूस बियाण्यांची मागणी आहे. 99 टक्के शेतकरी 'बोलगार्ड 2' किंवा बीटी कापूस लागवड करतात. देशी किंवा सरळ वाणांची लागवड करीतच नाहीत, असा दावा करून कृषी विभाग आपल्या चालढकलपणावर पांघरूण घालत असल्याची स्थिती आहे.


Share to ....: 72                

Currency

World Cotton Balance Sheet

India Cotton Balance Sheet

Visiter's Status

knowledge management

Weather Forecast India

how to add shortcut on chrome homepage - www.cottonyarnmarket.net


Upload your business visiting Card:
No Image