कापसाचे चार नवे वाण विकसित

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांची माहिती -


June 22, 2022 नागपूर ः केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने महाराष्ट्रासाठी अधिक लांब धागा (लाँग स्टेपल) असलेले, तर दक्षिण विभागासाठी गर्द तपकिरी रंगाचे नवे कापूस वाण (New Cotton Verity) संशोधित केले आहे. हे दोन्ही वाण केंद्र सरकारकडून नोंदणीकृत झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आलेले ‘सुरक्षा’ हे वाण नॉन बीटी (Non BT Cotton) आहे. या सरळ वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या धाग्यांची लांबी ही ३२ मि.मी.आहे. १६० दिवसांत हे वाण परिपक्‍व होत असून, हेक्‍टरी उत्पादकता २३ क्‍विंटल मिळते. दक्षिण भागासाठी ‘वैदेही-१’ हे रंगीत कापसाचे वाण विकसित करण्यात आले आहे. नैसर्गिकरीत्या गर्द तपकिरी रंगाचा कापूस या वाणापासून मिळविणे शक्‍य होते. सिंचन सुविधा असल्यास या कापसाची उत्पादकता २० क्‍विंटल, तर कोरडवाहू भागात १५ क्‍विंटल इतकी मिळते. सध्या नैसर्गिक रंगांना मागणी आहे. त्यामुळे हे वाण प्रसिद्ध होईल, असा विश्‍वास संस्थेच्या तज्ज्ञांनी व्यक्‍त केला.
‘बीजी-१’ या जीनचा अंतर्भाव असलेले दोन बीटी वाण ही संस्थेने विकसित केली आहेत. त्यामध्ये ‘बीटी-९’ आणि ‘बीटी-१४’ यांचा समावेश आहे.



केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापूस उत्पादकांना नवे वाण, तंत्रज्ञान देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आता देखील दक्षिण तसेच मध्य विभागासाठी वाण विकसित करण्यात आली आहेत. त्यामध्ये रंगीत कापूस वाणाचा देखील समावेश आहे. रंगीत कापसाचे वाण हे दक्षिण विभागासाठी आहे. नॉनबिटी वाण महाराष्ट्रात प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे.
डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक,
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर


Share to ....: 312    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31521156

Saying...........
Love is a matter of chemistry; sex is a matter of physics.





Cotton Group