भारतीय कापसाला जगभर प्रतिष्ठा!

जागतिक स्तरावर कापूस लागवड (Cotton Cultivation) क्षेत्रात भारताचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादनाच्या बाबतीत मात्र जगातील इतर कापूस उत्पादक (Cotton Producer Countries) देशाच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे. -


August 02, 2022 कापसाच्या उत्पादकता वाढीसोबतच त्याचे ब्रँडिंगदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता भारताच्या कापसाला जागतिकस्तरावर ओळख मिळावी याकरिता कस्तुरी ब्रॅंडने त्याचे प्रमोशन केले जाणार आहे.

शुक्रवारी (ता. २९) मुंबईत या विषयावर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्स्टाइल समितीचे अजित चव्हाण यांच्यासह ऑनलाइन माध्यमातून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते.

अमेरिका, इजिप्तसारख्या देशांनी कापसाच्या ब्रँडिंगवर भर दिला आहे. त्याचे मूल्यवर्धन देखील त्याच ब्रँडनेम खाली केले जाते यातून त्यांना प्रीमियम मिळतो. संबंधित देशांचा ब्रँड असल्याने त्यांच्या कापसाचा दर ते निर्धारित करतात.

भारताचा कापसाचा ब्रँड नसल्याने आपल्याला खरेदीदार मागतील त्याच भावात कापूस विकावा लागतो. त्यामुळेच भारतीय कापसाचा ब्रँड केला जाणार आहे.


Share to ....: 358    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31658805

Saying...........
Men are neither suddenly rich nor suddenly good.





Cotton Group