Cotton Rate : कापूस बाजाराची स्थिती काय?

दिवसभरात कापूस दरात चढउतार होत आहेत. मात्र देशातील बाजारात कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. -


November 24, 2022 पुणेः आंतराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात (Cotton Rate) आज काहीशी वाढ झाली होती. मात्र कापूस बाजारावरील (Cotton Market) दबाव अद्यापही कायम आहे. दिवसभरात कापूस दरात चढउतार होत आहेत. मात्र देशातील बाजारात कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापूस दरात आज काहीशी दिलासादायक स्थिती होती. कापसाच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांपासून चढ-उतार सुरु होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे नरमले. मात्र कालच्या तुलनेत दरात आज वाढ पाहायला मिळाली. आज कापसाचे वायदे ८२.१८ सेंट प्रतिपाऊंडने पार पडले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरावर चीनमधील कोरोना स्थिती, वाढती महागाई आणि इंधनाचे वाढलेले दर याचा परिणाम होत आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना निर्बंध कडक होत आहेत. याचा परिणाम चीनच्या कापूस मागणीवर होण्याच्या भीतीने दर तुटले होते. ते आता काहीसे उभारी घेत आहेत.

देशातील बाजारात आज कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात कापसाचे दर मागील सहा दिवसांमध्ये सरासरी ५०० रुपयाने नरमले होते. तर आज अनेक बाजारांमध्ये कापूस दर क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी सुधारले होते. तर कमाल दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तर बहुतांशी बाजारात कापसाचे दर आजही सरासरीच्या जवळपास होते. मात्र देशातील कापूस बाजारात आज सकारात्मक वातावरण होते, असे कापूस व्यापाऱ्यांनी सांगितले.

………..
आजची दरपातळी
आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये दर मिळाला. मात्र कमाल दराने आजही ९ दराचा टप्पा पार केला नाही. गुजरात आणि तेलंगणात काही ठिकाणी कापसाला कमाल ९ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. मात्र राज्यात कमाल दर अपेक्षेप्रमाणं वाढले नाहीत.

कापूस दर सुधारणार का?
सध्या कापसाच्या दरात चढउतार सुरु आहेत. कापूस दरातील ही स्थिती पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने केल्यास बाजारातील आवक मर्यादीत राहील. त्यामुळं दर जास्त तुटणार नाहीत. असं झाल्यास जानेवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.


Share to ....: 363    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31520188

Saying...........
Love does much but money does more.





Cotton Group