Cotton Cultivation : कापूस पीक लागवडीत यांत्रिकीकरणाची गरज

कापूस पिकाच्या लागवडीमध्ये उत्पादन खर्च व वेळेत बचत करणे गरजेचे आहे. यासोबतच मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाची गरज असल्याचे मत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले. -


December 06, 2022 नांदेड : कापूस पिकाच्या (Cotton Crop) लागवडीमध्ये उत्पादन खर्च व वेळेत बचत करणे गरजेचे आहे. यासोबतच मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाची गरज असल्याचे मत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत योजनांच्या माध्यमातून गुरुवारी (ता. १) आयोजित शेतकरी मेळावा व निविष्ठावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, अखिल भारतीय कापूस संशोधन प्रकल्प, प्रकल्प समन्वयक डॉ. ए. एच. प्रकाश, ‘महाबीज’चे महाव्यवस्थापक डॉ. लहाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग आदी उपस्थित होते.

कुलगुरू मणी म्हणाले, की भविष्यकाळातील शेती ही ड्रोनच्या साह्याने केल्यास शेतकऱ्यांचा वेळ व श्रम यात बचत होईल. कापूस पिकातील संशोधन व प्रसार कार्याबद्दल कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांची कुलगुरू यांनी प्रशंसा केली.

रविशंकर चलवदे यांनी भरडधान्याचे आहारातील महत्त्व सांगून कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावा, असे सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील नवीन बीटी संकरित वाण लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत देऊ असे महाबीजचे महाव्यवस्थापक डॉ. लहाने यांनी सांगितले. या वेळी सर्व शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी यांनी कापूस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर संशोधन प्रयोगांची पाहणी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बस्वराज भेदे, डॉ. विजय चिंचाणे, डॉ. पवन ढोके, प्रा. अरुण गायकवाडयांनी प्रयत्न केले.

कपाशीची सघन पद्धतीने लागवड महत्त्वाची

बदलत्या हवामानात तग धरणारा नांदेड ४४ बीटी हा वाण वनामकृविद्वारे महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. याचप्रमाणे एनएचएच २५० बीटी व एनएचएच ७१५ बीटी महाबीजच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करून दिले जातील. कापूस पीक फायदेशीर ठरण्यासाठी कपाशीची सघन पद्धतीने लागवड करणे हा पर्याय, असल्याचे डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.


Share to ....: 100                

Currency

World Cotton Balance Sheet

India Cotton Balance Sheet

Visiter's Status

knowledge management

Weather Forecast India

how to add shortcut on chrome homepage - www.cottonyarnmarket.net


Upload your business visiting Card:
No Image