कापसाच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, तिसऱ्या दिवशी दर वाढले, बाजारातून शेतकऱ्यांसाठी चांगली अपडेट

... -


March 24, 2023 अकोला : विदर्भातील कापसाची पंढरी समाजल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. अकोल्याच्या बाजारात तुरीचे दर स्थिरावले असून गुरुवारच्या तुलनेत आज तुरीच्या दरात ५५ रुपयांनी घसरण झाली. अकोटमध्ये कापसाच्या कमाल दरात १५ रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत अकोटमध्ये कापसाला जास्तीत जास्त ८ हजार ३५० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. तसेच तुरीला ८ हजार ४५० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला.
यंदा अकोला जिल्ह्यातील गावातील शेतकऱ्यांच्या कापसाला मागील वर्षी १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मिळालेल्या भावामुळे अकोल्यात ९० टक्के शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचा पेरा केला. मात्र यंदा कापसाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा झाली आहे. अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाच्या दरात पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळ कापसाचे दर ७ हजार ७०० पासून ८ हजार ३५० रूपांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे पोहचले. आज २ हजार ४०० इतकी क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.


Share to ....: 838    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31676439

Saying...........
Men, their rights, and nothing more; women, their rights, and nothing less.





Cotton Group