Cotton Market : कापूस उत्पादन अंदाज शेतकऱ्यांच्या मुळावर

Cotton Market Update : देशात यंदा नेमके किती कापूस उत्पादन झाले याविषयी विविध संस्थांचे अंदाज वेगवेगळे आहेत. ‘सीएआय’ आणि ‘सीओसीपीसी’ या संस्थांच्या अंदाजात तब्बल ४५ लाख गाठींची तफावत आहे. -


June 03, 2023 Pune News : देशात यंदा नेमके किती कापूस उत्पादन झाले याविषयी विविध संस्थांचे अंदाज वेगवेगळे आहेत. ‘सीएआय’ आणि ‘सीओसीपीसी’ या संस्थांच्या अंदाजात तब्बल ४५ लाख गाठींची तफावत आहे.

सीएआयने यंदा २९८ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला. तर सीओसीपीसीने ३४३ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे म्हटले आहे.

सीओसीपीसीच्या अंदाजावरून शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याचे व्यापारी आणि उद्योग सांगतात. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत.

देशात सध्या कापूस उत्पादनाविषयीच्या आकड्यांचा गोंधळ सुरू असल्याचे दिसते. मात्र या गोंधळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. देशात कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज वर्तविणाऱ्या दोन संस्था आहेत.

त्यात कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात सीएआय आणि कापूस उत्पादन आणि वापर समिती म्हणजेच सीओसीपीसी.

पण या दोन्ही संस्थांच्या उत्पादनाच्या अंदाज यंदा मोठी तफावत आहे. त्यामुळे कापूस बाजारातील घटक आपल्या सोयीप्रमाणे अंदाज गृहीत धरून शेतकऱ्यांची कोंडी करताना दिसत आहेत.

काय आहे अंदाज?

सीओसीपीसीने यंदा देशात जवळपास ३४३ लाख टन कापूस उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त केला. तर सीएआयचा अंदाज २९८ लाख गाठींचा आहे. म्हणजेच दोन्ही संस्थांच्या अंदाजात तब्बल ४५ लाख गाठींची तफावत आहे.

पीक उत्पादनामध्ये एवढी मोठी तफावत असल्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. व्यापारी आणि उद्योग सीओसीपीसी या संस्थेचा अंदाज गृहीत धरून कापूस मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत.

राज्यनिहाय अंदाजातील तफावत

राज्यनिहाय विचार करता सर्वाधिक तफावत तेलंगणा राज्यातील उत्पादनाविषयी आहे. सीओसीपीसीच्या मते यंदा तेलंगणात ५३ लाख गाठी कापूस उत्पादन झाले. तर सीएआयच्या मते उत्पादन ३१ लाख टनांवर स्थिरावले.

म्हणजेच दोन्ही संस्थांच्या अंदाजात २२ लाख गाठींची तफावत आहे. तर महाराष्ट्राच्या अंदाजात ११ लाख गाठी आणि कर्नाटकाच्या अंदाजात साडेपाच लाख गाठींची तफावत दिसून आली.


कोण कसा अंदाज काढते?

आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की नेमका कुणाचा अंदाज खरा मानायचा? सीएआयचा की सीओसीपीसीचा? आधी दोन्ही संस्था कसा अंदाज काढतात ते पाहू. सीएआय कापूस उत्पादक राज्यातील जिनिंग उद्योगांच्या संघटनेकडून कापूस गाठींची माहिती घेत असते.

गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी कापूस उत्पादक राज्यांतील जिनिंग संघटना सीएआयला तयार झालेल्या कापूस गाठींची माहीती देतात. त्यावरून सीएआय आपला अंदाज देत असते. तर सीओसीपीसी पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून आपला अंदाज जाहीर करते.

कोणाचा अंदाज अचूक मानायचा?

दोन्ही संस्थांच्या कापूस उत्पादनाचा अंदाज काढण्याच्या पद्धती लक्षात घेता अनेक जाणकार आणि अभ्यासक सीएआयचा अंदाज गृहीत धरतात. कारण हा अंदाज उद्योगांनी तयार केलेल्या कापूस गाठींवरून काढलेला असतो.

म्हणजेच हा कापूस हाती आलेला असतो. यंदा सीएआयने २९८ लाख गाठींचा अंदाज जाहीर केला आहे. तर आतापर्यंत जवळपास २५६ लाख गाठी कापूस बाजारात आला. म्हणजेच शेतकऱ्यांकडे आता कमी कापूस शिल्लक आहे.

बाजारातील परिस्थिती

मागील काही दिवसांपासून देशातील बाजारातील कापूस आवक कमी झाली. त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली. सध्या कापसाला ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

यापुढे बाजारातील आवक यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता नाही. म्हणजेच आवक कमी होत जाईल. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


Share to ....: 124                

Currency

World Cotton Balance Sheet

India Cotton Balance Sheet

Visiter's Status

knowledge management

Weather Forecast India

how to add shortcut on chrome homepage - www.cottonyarnmarket.net


Upload your business visiting Card:
No Image