Cotton Value Addition : कापूस पिकामध्ये मूल्यवर्धन महत्त्वाचे

... -


September 03, 2023 Cotton Crop Processing : केवळ उत्पादना पुरतेच मर्यादित न राहता कापसाच्या मूल्यवर्धन करण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे असून त्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.
Jalna News : केवळ उत्पादना पुरतेच मर्यादित न राहता कापसाच्या मूल्यवर्धन करण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे असून त्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उद्योगाभिमुख अभ्यास दौरे व शेतकरी प्रशिक्षण, गटशेतीसह जोडधंदा, पिकांचे व्यवस्थापन आदी उपक्रमांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आत्माच्या माध्यमातून केले जाते.

आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव हडप येथे नुकताच कापूस कीड रोग व्यवस्थापन व कापूस भाव जोखीम व्यवस्थापनावर आधारित शेतकरी प्रशिक्षण पार पडले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी विज्ञान केंद्राचे अजय मिटकरी, नाबार्डचे तेजल क्षीरसागर, स्मार्टचे श्रीकांत देशपांडे, एमसीएक्सच्या दक्षा जानी, प्रगतीशील शेतकरी भगवान डोंगरे, आत्माचे दत्तात्रय आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी कसा करावा, रासायनिक शेतीच्या विळख्यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी घरच्या निविष्ठा वापर करण्याच्या सल्ला दिला.

मानवी आरोग्यासोबातच जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. कापूस पिकातील आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या. कृषी विज्ञान केंद्राचे अजय मिटकरी यांनी कापूस व सोयाबीन कीड रोग व्यवस्थापन या विषयावर व गुलाबी बोंडअळी ,या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आत्माचे अर्जुन मद्दलवार, प्रमोद जाधव, बळीराम कडपे, कृषी सहायक वानखेडे, पर्यवेक्षक श्री ढगे, सचिन गोल्डे, शरद खेडेकर, आयडियल अॅग्रीटेक प्रोड्युसर कंपनीचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते. स्मार्ट कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता .


Share to ....: 581                

Currency

World Cotton Balance Sheet

India Cotton Balance Sheet

Visiter's Status

knowledge management

Weather Forecast India

how to add shortcut on chrome homepage - www.cottonyarnmarket.net


Upload your business visiting Card:
No Image