पावसाने हाहाकार! शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला; सोयाबीन, कापूस पाण्यात

... -


September 26, 2024 परळी वैजनाथ: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घातले असून पावसामुळे हाहाकार माजला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तर सोयाबीनच्या शेंगांची गळती होऊन वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मायबाप सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसामुळे नद्या, नाल्या, ओढे खळाळले असून नदीला आलेल्या पुरामुळे, बीड-परळी व परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.


Share to ....: 221    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 35995141

Saying...........





Cotton Group