कापूस वेचायला मजूर मिळेनात, पांढरे सोने खराब होण्याची चिंता:वेचणीचा खर्च जवळपास सव्वा पटीने वाढ

... -


November 18, 2024 मागच्या वर्षांपासून कापसाला चांगला भावही नाही. यावर्षी कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल भाव आहे. त्यामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. त्यातच आता आणखी कापूस वेचणीसाठी माणसे मिळत नसल्यामुळे त्यांची पुरती कोंडी झाली आहे. कापूस वेचणीसाठी परगावाहून माणसे आणावे लागत आहेत. कापूस प्रति किलो दहा ते बारा रुपये भावाने वेचला जात आहे. त्यामुळे हा खर्च वाढल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

एक क्विंटल कापूस वेचणीसाठी एक हजार बाराशे रुपये खर्च येत आहे. कापसाला भाव सात हजार रुपये एवढा आहे. वर्षभराची मेहनत बियाणे खताचा खर्च वेगळीच त्यामुळे कापसाचे ही चांगले पीक येऊनही अर्थकारण बिघडताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्या सोबतच हा पांढरा कापूस सुद्धा काळवंडताना दिसत आहे. यावर्षी तालुक्यात जवळपास दहा हजार हेक्टर एवढा कापूस लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पादन ही चांगले होण्याची आशा आहे. मात्र या वेचणीसाठी निर्माण झालेल्या अडचणीमुळे शेतकऱ्याची धावपळ होताना दिसत आहे.
कापूस वेचणीच्या काळातच निवडणुका लागल्यामुळे लोक निवडणुकीसाठी दररोज एकाच्या तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या सभेला जात आहेत. त्यामुळे या कापूस वेचणीकडे मजूर ही फिरकत नाहीत. यामुळे कापूस शेतातच पडून आहे.

खर्च जास्त व उत्पादन कमी कापसाचा एकंदरीत एकरी खर्च अंदाजे ३० हजार रुपये कापसाचा एकंदरीत एकरी खर्च अंदाजे ३० हजार रुपये एवढा आहे. अपेक्षित उत्पन्न पाच ते सात क्विंटल एवढेच होत आहे. त्यामुळे कापूस कमी भावामुळे परवडत नाही. असेच चित्र दिसत आहे. खर्च जास्त आणि उत्पादन कमी आणि त्यात पुन्हा ही बेजारी यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. यावर्षी झालेल्या बऱ्यापैकी पावसामुळे पीक चांगले दिसत असतानाच कापूस वेचणीसाठी करावी लागणारी प्रचंड कसरत त्यामुळे शेतकरी पुरता निराश झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जात आहे.
पाऊस वेळेवर झाल्याने कापसाचे पीक जोरदार आले आहे. कापूस काढणीला आला असून कापूस त्वरीत वेचणे गरजेचे आहे. मात्र, मजूर मिळतच नाहीत. त्यासाठी शेतकऱ्याला वणवण फिरावे लागत असून दुसऱ्या गावाहून मजूर आणून त्यांना जास्तीचा भाव देऊन जाण्यायेण्याचा खर्च द्यावा लागत आहे. त्यामुळे कापूस पूस वेचणीचा वे खर्च जवळपास सव्वा पटीने वाढला आहे. कापसाला भावही साडेसहा हजार ते सात हजार एवढाच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो की काय असे चित्र आहे. - बबनराव लाहामगे, शेतकरी, आलेगाव.


Share to ....: 169    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 35536288

Saying...........
The graveyards are full of indispensable men.





Cotton Group