Cotton : आता कापूस बियाणे विक्रीवरुन वाद, राज्य सरकारच काढणार तोडगा, नेमके प्रकरण काय?

... -


May 15, 2022 कपाशीचे बियाणे उत्पादकांकडून मार्केटमध्ये केव्हा येणार? विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना केव्हा दिले जाणार याबाबत कृषी विभागाने एक वेळापत्रकच जारी केले आहे. मात्र, हा निर्णय कपाशीबाबतच का असा सवालही उपस्थित केला जात आहे. पण कपाशीचा पेरा वेळेपूर्वी झाला तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतो. शिवाय इतर पिकांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ऐन वेळी बियाणे बाजारात दाखल झाले तर ते योग्य होईल.

विक्रेत्यांकडून हे बियाणे</a> शेतकऱ्यांना मिळेल असे सांगण्यात आले आहे पण आता याला (<strong>Seed sellers</strong>) विक्रेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे. दरवर्षी अक्षयतृतेयापासून कापशीच्या बियाणांची विक्री केली जाते यंदा मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कृषी विभागाने तो निर्णय घेतला होता. पण या निर्णयामुळे शेतकऱ्यांचीच अडचण होईल तर बोगस बियाणांचा सुळसुळाट वाढेल असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा वाद थेट राज्य सरकारच्या दरबारात गेला आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो हे देखील पहावे लागणार आहे.


Share to ....: 258    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31720622

Saying...........
Misfortune: the kind of fortune that never misses.





Cotton Group