Cotton Ginning : कापूस नसल्याने अर्धे जिनिंग रिकामे

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस जास्त झाला. अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस उत्पादनात घट आली. -


January 19, 2023 यवतमाळ : कापसाला कधी नव्हे, एवढा नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर गेल्यावर्षी मिळाला. यंदा कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत.

दर वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस (Cotton) घरातच ठेवला आहे. शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन गाठी तयार करून त्याची निर्यात (Cotton Export) करण्यासाठी जून-जुलैपर्यंत जिनिंग, प्रेसिंग उद्योग सुरू राहात होते. यंदा मात्र, बाजारात कापूसच येत नसल्याने ५० टक्के जिनिंग, प्रेसिंग मिल बंद झाल्या आहेत.

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस जास्त झाला. अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस उत्पादनात घट आली.

त्यामुळे कापूस कमी प्रमाणात बाजारात आला. परिणामी दिवाळीच्या काळात कापसाला बऱ्यापैकी दर मिळाला. आता तो दर खाली घसरला आहे.

शिवाय, कापसाचे दर वाढेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. त्याचा परिणाम गाठींवर झाला आहे.

कापूस नसल्याने जिल्ह्यातील अनेक जिनिंग-प्रेसिंग रिकामेच आहेत. जिल्ह्यात ८७ जिनिंग आहेत. त्यातील मोजक्याच जिनिंगला कापूस मिळाला आहे. त्यामुळे अनेक जिनिंग रिकाम्याच आहेत.

तब्बल १५ कोटींचा तोटा

आतापर्यंत जवळपास १५ कोटी रुपयांचा तोटा या उद्योगाला कापसाअभावी सहन करावा लागला आहे. प्रत्येक लॉटमागे पाच लाख रुपयांचे नुकसान जिनिंगमालकांना होत आहे.

आतापर्यंत दहा लॉट निघाले आहेत. त्यात दहा कोटी, तर ओव्हररेटचे जवळपास पाच कोटी असे एकूण १५ कोटींचे नुकसान जिनिंगमालकांचे झाले आहे.


Share to ....: 210    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31714834

Saying...........
Misfortune: the kind of fortune that never misses.





Cotton Group