सततच्या पावसाचा कपाशीला फटका, विद्यापीठाने दिला हा सल्ला

... -


August 17, 2022 Maharashtra News:कपाशीचे पीक सध्या उगवण ते पाते फुटण्याच्या अवस्थेत आहे. मात्र सतत सुरू असलेला पाऊस आणि जास्त आर्द्रतेमुळे कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी असे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मात्र, नगर जिल्ह्यात सध्या मोठा पाऊस होणार नाही. पुढील पाच दिवस जिल्ह्यात हवामान अशंत: ढगाळ राहील. अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी येतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आला आहे. सततच्या पावसामुळे कपाशीवर रोग पडत आहे.

त्यामुळे पांढरी माशी व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी उघडीप मिळाल्यानंतर अॅसिटॅमिप्रिड २० एस पी २ ते ३ ग्रॅम अधिक स्टिकर १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

त्यानंतर ८ ते १० दिवसांनी अॅसिफेट १० ग्रॅम अधिक स्टिकर १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. सध्याच्या हवामानाचा काद्यांला फटका बसत आहे.

कांदा पिकावर फुल किडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यासाठी लॅम्बडासायहॅलोथ्रीन ६ मिली अधिक टेब्युकोनॅझोल १० मिली अधिक स्टिकर १० मिली प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने फवारावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

सोयाबीन सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्यावरील स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी मुख्य पिकाचे कडेने एरंडीची एक ओळ सापळा पिक म्हणून पेरावी.

स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्‍टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.


Share to ....: 258    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31877329

Saying...........
Never let your sense of morals interfere with doing the right thing.

Cotton Group