पांढऱ्या सोन्याचे यंदा तीस टक्केच उत्पन्न; शेतकरी वर्गात चिंता

... -


November 28, 2023 वैजापूर : तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कापूस उत्पादनात तब्बल सत्तर टक्के फटका बसला आहे. याचा थेट परिणाम जिनिंग प्रेसिंग व्यवसायावर झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात ९ जिनिंग मिल सुरू होत्या. यंदा मात्र, केवळ ३ ठिकाणी मिल सुरु झाल्या असून .त्यामुळे ६५ हजार गाठींचे उत्पादन आता १० ते १५ हजारच गाठींवर आल्याचे चित्र तालुक्यातील जिनिंग व्यावसायिकांवर आहे.

यावर्षी तालुक्यातील १२ पैकी १२ महसूल मंडळात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने ऑक्‍टोबर महिन्यात सर्वच धरणात शून्य टक्के पाणी साठा आहे. यंदा नद्या, नाले दुथडी भरूनही वाहताना दिसले नाही. यामुळे दोन वेचनीत कापूस पिकांचे उत्पादन संपुष्टात आले. दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसला आता कापूस खरेदीचे बाजारभाव कमी जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. गेल्या आठवड्यात ७ हजार ५०० रुपये क्विंटल विकणारा कापूस व्यपारी आता ७ हजार रुपये क्विंटलने खरेदी करत आहे.


Share to ....: 612    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 32878961

Saying...........
One man plus courage is a majority.





Cotton Group