स्मार्ट प्रकल्पातील शेतकऱ्यांद्वारे कापसाचा जिनिंगला पुरवठा

Supply of Cotton : आत्मा प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी समुहाच्या वतीने या हंगामात उत्पादीत कापसाचा पुरवठा प्रक्रियेकामी जे. आर. कॉटन जिनिंग हिंगणघाटला करण्यात आला. -


December 28, 2023 Vardha News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट कॉटन) आत्मा प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी समुहाच्या वतीने या हंगामात उत्पादीत कापसाचा पुरवठा प्रक्रियेकामी जे. आर. कॉटन जिनिंग हिंगणघाटला करण्यात आला.

हिंगणघाट तालुक्‍यात सुलतानपूर येथील शेतकरी गटातील समन्वयक प्रकाश भोयर यांच्या समन्वयाने भारत भोयर यांनी ६.९२, गणेश भोयर १९.९८, प्रकाश भोयर १७.७४ याप्रमाणे ४४.७४ क्‍विंटल कापूस संकलित करून त्याचा पुरवठा जिनिंगला करण्यात आला.

स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी गुलाब भदाणे व हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार, महाकॉटचे मार्केटिंग हेड चंद्रशेखर चवने, पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ बि.बि. बलगमवार, आर्थिक व वित्तीय सल्लागार एस. बी. ठाकरे यांची यावेळी उपस्थिती होती.

शेतकरी समूहाचे प्रकाश भोयर व रामचंद्र बोरकर यांचा जिनींग मालक राहुल वैद्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाचा वजनकाटा करुन जिनिंगमधील नियोजित ठिकाणी संकलित करण्यात आले.

मूल्यसाखळी तज्ज्ञ देवेंद्र देशमुख यांनी संकलित कापसाची आर्द्रता व इतर घटकांची तपासणी करून शेतकऱ्यांना पोहच पावती दिली. आत्मा यंत्रणेचे साहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद देवतळे, कॉटन ग्रेडर रवीस भांदिकर, एस.एन. काळपांडे, कापूस उत्पादक शेतकरी गटातील अनिकेत दिवे, सूरज चंदनकर, देवीदास भोयर यांची यावेळी उपस्थिती होती.


Share to ....: 256    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 33510957

Saying...........
Pro is to con as progress is to Congress.





Cotton Group