शेतकरी उत्पादित करणार दहा हजार कापूस गाठी

Cotton Market : देशांतर्गत बाजारात कापूस गाठी आणि सरकीला अपेक्षित मागणी आणि दर नाही. परिणामी, स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी देखील तूर्तास प्रक्रियेला ‘ब्रेक’ दिला आहे. -


February 05, 2024 Nagpur News : देशांतर्गत बाजारात कापूस गाठी आणि सरकीला अपेक्षित मागणी आणि दर नाही. परिणामी, स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी देखील तूर्तास प्रक्रियेला ‘ब्रेक’ दिला आहे.
‘स्मार्ट कॉटन’द्वारे यंदाच्या हंगामात दहा हजार गाठी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २ हजार ५६६ गाठी तयार झाल्या आहेत,’’ अशी माहिती प्रकल्पाचे नोडल अधिकारी जयेश महाजन यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत कापूस प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. जागतिक बॅंकेच्या निधीतून सहा वर्षांसाठीच्या या प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष आहे. येत्या चार वर्षांत या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. प्रकल्पात सद्यःस्थितीत ९१७ शेतकरी गटांनी कापूस प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे.

६ हजार ८६४ शेतकरी, ५८ जिनिंग व्यावसायिकांचा यात समावेश आहे. १८ हजार क्‍विंटल कापूस संकलित झाला आहे. त्यातील १५ हजार ५५१ क्‍विंटल (८५ टक्‍के) कापसावर पहिल्या टप्प्यात जिनिंग झाले आहे. प्रक्रियेअंती १० हजार ४०७ क्‍विंटल सरकी उत्पादन झाले आहे. त्यातील ६ हजार ९०६ क्‍विंटल सरकीची विक्री करण्यात आली, तर ३ हजार ६११ क्‍विंटल शिल्लक आहे.
विकलेल्या सरकीपैकी ५ हजार २४४ क्‍विंटलची (७७ टक्‍के) डिलिव्हरीदेखील झाली आहे. सरकी विक्रीची ६० टक्‍के रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे देखील जयेश महाजन यांनी सांगितले. संकलित कापसापासून २५६६ गाठी तयार होतील. त्यातील २ हजार २८३ (८८ टक्‍के) गाठी दरवाढीच्या अपेक्षेने गोदामात ठेवण्यात आल्या आहेत.

‘क्युआर कोड’चा उपयोग

प्रकल्पातील गाठींना क्यूआर कोड देण्यात आला आहे. त्या माध्यमातून गाठीसाठींचा कापूस कोणत्या शेतकऱ्याचा किती आहे. त्याचा दर्जा या बाबतची माहिती कळेल, अशी पारदर्शक व्यवस्था या प्रकल्पातून उपलब्ध केली आहे.

कापसाच्या दरात चढ-उतार होतात. परंतु त्याचे मूल्यवर्धन केल्यास सरकी आणि गाठ विक्रीतून फायदा होऊ शकतो. याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा प्रकल्प राबविला जात आहे. यंदा प्रकल्पातून १० हजार गाठींच्या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
- जयेश महाजन, नोडल अधिकारी, स्मार्ट कॉटन


Share to ....: 179    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 32875698

Saying...........
One man plus courage is a majority.





Cotton Group