नागपूर जिल्ह्यात कापसाचे शेतकऱ्यांकडून मूल्यवर्धन

Cotton Processing : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत कापूस उत्पादकपट्ट्यात मूल्यवर्धनाला प्रोत्साहन दिले जात आहे. -


February 06, 2024 Nagpur News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत कापूस उत्पादकपट्ट्यात मूल्यवर्धनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून शिरपूर येथील शेतकऱ्यांचा ५५० क्‍विंटल कापूस जिनींगकामी रवाना करण्यात आला. या कापसापासून सुमारे १०० गाठी तयार करण्यात येणार आहेत.
स्मार्ट कॉटन प्रकल्पातून कापूस उत्पादकांमध्ये मूल्यवर्धनाचे गुण रुजविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कापसावर प्रक्रिया करीत त्यापासून गाठ आणि सरकी वेगळी होते. या दोन्ही मूल्यवर्धित घटकांची विक्री करुन कापूस उत्पादकांच्या नफ्याचे मार्जीन वाढविण्यात येत आहे.

याच प्रकल्पा अंतर्गत व्याहड येथील महाकाली माता शेतकरी समूहाच्या शेतकऱ्यांचा कापूस प्रक्रियेकामी पाच वाहनांतून बाजारगाव येथील गावंडे जिनींगला पाठविण्यात आला. या वाहनांना आत्मा प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी हिरवी झेंडी दाखविली.

या वेळी नागपूर तालुका कृषी अधिकारी मनीषा थेरे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर मोतीकर, ग्रेडर मोहन ढवळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शिल्पा टेंभूर्णीकर, स्मार्ट प्रकल्प अधिकारी सौ. गावंडे, उपसभापती अविनाश पारधी, सरपंच माणिक अदमाने, वाघमारे यांची उपस्थिती होती.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

स्मार्ट कॉटन अंतर्गत स्मार्ट कॉटन ब्रॅण्डने कापूस गाठींची विक्री करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गाठ उत्पादनासाठी केला आहे. समूहातील कोणत्या शेतकऱ्याने किती कापूस दिला, कापूस कोणत्या गाव, तालुका आणि जिल्ह्यातील आहे हे कळावे याकरिता गाठीवर क्‍यू-आर कोड देण्यात आला आहे. नोडल अधिकारी जयेश महाजन यांच्या मार्गदर्शनात या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे.


Share to ....: 223    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 35993767

Saying...........





Cotton Group