हमीभावापेक्षा कापसाचे दर चारशे रुपयांनी खाली

Cotton Market : कापसाच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. सध्या कापसाला हमीभावापेक्षा ३७० रुपयांनी दर कमी मिळत आहे. -


February 09, 2024 Yavatmal News : कापसाच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. सध्या कापसाला हमीभावापेक्षा ३७० रुपयांनी दर कमी मिळत आहे. अशातच मंगळवारी (ता. सहा) कापसाच्या दरात पन्नास रुपयांची आणखी घसरण झाली आहे. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी झटका बसला आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरात सातत्याने होणारी घट पाहता शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाला आहे. सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षा तब्बल ३७० रुपयांनी कमी आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवला आहे. दरात वाढ होण्याऐवजी सातत्याने घट होत आहे. जिल्ह्यात ‘सीसीआय’चे केंद्र आता सुरू होत आहे. काही ठिकाणी केंद्र सुरू झाले असले तरी ‘क्वालिटी’चा कापूस नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे.

तोच कापूस कमी दरात व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. पणन महासंघाची कापूस खरेदी यंदा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी दरात कापूस घेऊन तोच कापूस शासकीय केंद्रांवर विकला जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांत आहे. गेल्या आठवड्यात कापसाचे दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात मंगळवारी (ता. सहा) पुन्हा पन्नास रुपयांची घसरण झाली आहे. दर कमी होत असल्याने कापूस विकायचा की नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

कारवाई कुणावर करणार?

कापसाचे दर हमीभावाच्या खाली गेले आहेत. तब्बल ३७० रुपयांनी दर हमीभावापेक्षा कमी आहेत. हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. मात्र, बाजारभावाच सहा हजार ६५० रुपये असल्याने कारवाई कुणावर केली जाणार, असा प्रश्‍न आहे. शासकीय केंद्रांवर क्वालिटीपासून कापूस घ्यायचा की नाही० हे ठरविले जात आहे. त्यामुळे कोण कुणावर कारवाई करणार, हा प्रश्‍न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा झाला आहे.


Share to ....: 75    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31365974

Saying...........

Cotton Group