बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस घटत चालली ?

Market Update : दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे. त्यातच निर्यातीसाठीही चांगली मागणी आहे. -


February 27, 2024 Market Bulletin : देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आज कापूस भावात १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली होती. बाजारातील आवकही कमी झाली आहे. काल देशातील बाजारात १ लाख ४ हजार गाठींची आवक झाली होती. दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे. त्यातच निर्यातीसाठीही चांगली मागणी आहे.

त्यामुळे कापसाचा भाव आज ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान पोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली तेजी आली आहे. कापसाचे भाव यापुढील काळातही तेजीतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. राज्यात तसेच देशातील इतर महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमधील काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची किरकोळ आवक सुरु झाली. खुल्या बाजारात सध्या हरभरा चांगलाच भाव खात आहे.

त्याचा परिणाम बाजारातील दरावरही दिसून येत आहे. हरभरा भाव सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर यंदा हरभरा उत्पादनातही घट होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हरभऱ्याचे भाव यंदा चांगले राहू शकतात, असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कांद्याचा भाव काही बाजारात स्थिरावलेला दिसतो तर काही बाजारांमध्ये भाव काहीसे नरमले आहेत. बाजारातील आवकही कमी होताना दिसत आहे. पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर परिणाम दिसून येतो. सध्या कांद्याचा सरासरी भाव १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला.

काही बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याचीही आवक सुरु झाली आहे. पण उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. तर देशात भावपातळी कायम आहे. देशातील बाजारातील सरासरी दरपातळी आज ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

बाजारातील आवकही टिकून आहे. तसेच मागणी मंदावलेली आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो. आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे. रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्याने पुरवठा वाढलेला दिसतो. पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येत आहे.

त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सध्या ज्वारीला ३ हजार ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


Share to ....: 139    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31673640

Saying...........
Men, their rights, and nothing more; women, their rights, and nothing less.

Cotton Group