कापूस उत्पादकतेत २० ते ५६ टक्‍के वाढ

Cotton Production : देशांतर्गत कापसाच्या उत्पादकतेत वाढीच्या उद्देशाने केंद्र सरकारने अतिसघन आणि सघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एचडीपीएस’ (हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग सिस्टिम) प्रकल्पाची घोषणा केली होती. -


March 11, 2024 Nagpur News : सघन लागवड पद्धतीतून राज्यात कापूस उत्पादकतेत सरासरी २० ते ५३ टक्के, तर अतिसघन लागवड पद्धतीद्वारे सरासरी २१ ते ५६ टक्‍के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

‘‘देशांतर्गत कापसाच्या उत्पादकतेत वाढीच्या उद्देशाने केंद्र सरकारने अतिसघन आणि सघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एचडीपीएस’ (हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग सिस्टिम) प्रकल्पाची घोषणा केली होती.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने अंमलबजावणी केलेल्या या प्रकल्पाचे पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम समोर आले आहेत,’’ अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी दिली.

जगातील इतर कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता तुलनेने कमी आहे. विशेष म्हणजे जागतिकस्तरावर लागवड क्षेत्राच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सुमारे १३० लाख हेक्‍टरवर भारतात कापसाची लागवड होते.

परंतु सुधारित लागवड आणि व्यवस्थापन पद्धतीचा अभाव असल्याने उत्पादकता इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारच्या वतीने सघन आणि अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या नियंत्रणात केव्हीके व इतर संलग्न संस्थांद्वारे याची महाराष्ट्रात देखील अंमलबजावणी झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. सघन लागवड पद्धतीतून राज्यात कापूस उत्पादकतेत सरासरी २० ते ५३ टक्के, तर अतिसघन लागवड पद्धतीद्वारे सरासरी २१ ते ५६ टक्‍के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

..असे आहेत निष्कर्ष

सघन लागवड पद्धत (मध्यम जमीन)

लागवड अंतर ः ९० बाय ३० सेंमी.

झाडांची संख्या (प्रतिएकर) ः १४ हजार.

सहभागी शेतकरी ः ११९२

लागवड क्षेत्र ः २,८६७ एकर.

जिल्हे ः १६

अतिसघन लागवड पद्धत (हलकी जमीन)

लागवड अंतर ः ९० बाय १५ सेमी.

झाडांची संख्या (प्रतिएकर ) ः २९ हजार.

सहभागी शेतकरी ः ११६४

लागवड क्षेत्र ः३,१६५ एकर.

जिल्हे ः १०

कापूस पिकात सघन आणि अतिसघन लागवड पद्धतीला देशात प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम पहिल्याच वर्षी समोर आले आहेत. त्यातून राज्यात सरासरी २० ते ५६ टक्‍के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचा निष्कर्ष समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतींचा अवलंब जरूर करावा.
- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर


Share to ....: 178    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 32879183

Saying...........
One man plus courage is a majority.





Cotton Group