Cotton Market: खानदेशात कापसाची आवक अल्प

Cotton Arrival: खानदेशात कापसाची आवक कमी आहे. रोज पाच हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून, खेडा खरेदीत पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेसहा हजार रुपये असे दर मिळत आहेत. दर नीचांकी स्थितीत आहेत. -


October 31, 2025 Jalgaon News: खानदेशात कापसाची आवक कमी आहे. रोज पाच हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून, खेडा खरेदीत पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेसहा हजार रुपये असे दर मिळत आहेत. दर नीचांकी स्थितीत आहेत.
सध्या खंडीसह (३५६ किलोची एक खंडी) सरकीचे दर घटल्याचे कारण खरेदीदार सांगत आहेत. सरकी दरात सुधारणा मध्यंतरी झाली, पण ही सुधारणा टिकत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे. खानदेशात कापसाची बाजार समित्यांत कुठलीही आवक होत नाही.
कमाल कापसाची थेट किंवा खेडा खरेदी केली जाते. खेडा खरेदीत सध्या कापसाला ५००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. खानदेशात खेडा खरेदीत कमी दर्जाच्या कापसाचे दर ५००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मध्यंतरी कापूस दरात सुधारणा दिसत होती. पण ही सुधारणा फारशी टिकली नाही.
दरात मागील काही दिवसांत फारशी वाढ दिसत नाही. कापसाची आवक महिनाभरात वाढणार आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी खानदेशात रोज ४०० ते ५०० क्विंटल कापसाची आवक होत होती. त्यात मागील काही दिवसात सतत वाढ झाली आहे.
हमीभावात कापूस देणार कुठे?

खानदेशात खेडा खरेदीत यंदा कापसाची हमीभावात खरेदीच सुरू झालेली नाही. शासनाने मोठा गाजावाजा करून हमीभाव जाहीर केले. यानंतर कापूस खरेदीच्या बाता केल्या. परंतु कुठल्याही कापूस उत्पादक शेतकऱ्यास खेडा खरेदीत हमीभावाएवढे दर मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व सरकारविषयी रोष आहे. दुसरीकडे कापूस महामंडळाने देखील (सीसीआय) कापूस खरेदी सुरू केलेली नाही.


Share to ....: 70    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 40264977

Saying...........





Cotton Group