Cotton Crop Damage : वेचणीस आलेल्या कापसाला पावसाचा शाप; उत्पादकांवर आले मोठे संकट

Cotton Crop Damage : हातातोंडाशी आलेल्या कापसावर पावसाने पाणी फेरले. हिंगोली जिल्ह्यात सलग पावसामुळे कापूस शेतातच भिजून वाती तयार होत आहेत. उत्पादन घटणार, भाव कोसळणार, आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Cotton Crop Damage) -


October 31, 2025 googleNews
Cotton Crop Damage : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामाचे मोठे नुकसान केले असतानाच, आता वेचणीस आलेल्या कापसावरही पावसाचा मारा होत आहे.(Cotton Crop Damage)

सलग तीन दिवस चालू असलेल्या पावसामुळे शेतातच कापूस भिजत असून, त्याच्या वाती होऊ लागल्या आहेत. परिणामी, उत्पादन घटणारच नाही तर गुणवत्तेतही घसरण होऊन बाजारभाव कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Cotton Crop Damage)

सोयाबीन गेलं, आता कापूसही गेला!

मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसावर शेवटची आशा ठेवली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाने तो धक्का बसल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचला आहे.

भिजलेल्या कापसाची वेचणी किमान चार ते सहा दिवस थांबवावी लागणार असून, वेचणी केली तरी कापूस पिवळा पडण्याची शक्यता आहे. व्यापारी भिजलेला कापूस विकत घ्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

'सीसीआय' केंद्रांचा मुहूर्तच सापडत नाही

शेतकऱ्यांनी पहिली वेचणी पूर्ण केली असून, विक्रीसाठी कापूस तयार आहे. परंतु भारतीय कापूस महामंडळाचे (CCI) खरेदी केंद्र अजून सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच कापूस विकावा लागत आहे. या ठिकाणी व्यापारी कापसाला कवडीमोल दरात खरेदी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

नैसर्गिक संकटांमुळे मेटाकुटी

जुलै महिन्यात उघडीप, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, आता ऑक्टोबरअखेरीस पुन्हा पावसाचा मारा या चक्रात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने पिकांसह सुपीक माती वाहून गेली, काहींची गुरेही दगावली.


Share to ....: 32    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 40264836

Saying...........





Cotton Group