कापूस वेचणी मजुरी दर पोहोचला ११ रुपये किलोवर

Labour Shortage: पावसाची संततधार, अतिवृष्टीचा फटका बसत यंदा कपाशीची उत्पादकता घटली असतानाच आता फुटलेल्या कापसाच्या वेचणीसाठी वाढीव मजुरीसाठी मजूर अडून बसले आहेत. -


November 02, 2025 Yavatmal News: पावसाची संततधार, अतिवृष्टीचा फटका बसत यंदा कपाशीची उत्पादकता घटली असतानाच आता फुटलेल्या कापसाच्या वेचणीसाठी वाढीव मजुरीसाठी मजूर अडून बसले आहेत. वणी तालुक्‍यात यंदा पहिल्या वेच्यासाठीच ११ रुपये प्रति किलोप्रमाणे वेचणीसाठी मजुरी आकारली जात आहे. यातूनच उत्पादकता खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे
यवतमाळ जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी सुमारे ९ लाख हेक्‍टरवर होते. यात सर्वाधिक पावणेपाच ते पाच लाख हेक्‍टर क्षत्र हे एकट्या कापसाखाली राहते. परंतु यंदा जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार होती. त्याबरोबरच काही मंडलांमध्ये अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस बरसला.

त्याच्या परिणामी नद्या, नाल्यांना पूर आला तर काही ठिकाणी कापसाची फूल आणि बोंडधारणाच झाली नाही. याचा थेट परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. उत्पादकता आणि कापसाची प्रतही अपेक्षित नसताना बाजारात दरही कमी आहेत. ८८१० रुपये प्रति क्‍विंटल असा दर कापसाला असताना बाजारात मात्र ७००० ते ७२०० रुपयांनी कापसाचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.
सध्या वणी तालुक्‍यातील काही शिवारांत कापूस वेचणीसाठी आला आहे. परंतु कापसाची एकाचवेळी फूट झाल्याने वेचणीकामी मजुरांची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळेच वेचणी मजुरीत वाढ करण्यात आली आहे. सध्या कापूस वेचणीकामी प्रति किलो ११ रुपये असा दर वणी तालुक्‍यात आकारला जात आहे.
प्रति किलो मजुरी द्यायची नसल्यास दिवसातील काही ठरावीक तासांसाठी ३०० रुपये मजुरी दर घेतला जात आहे. दिवसभरात एका मजूराच्या माध्यमातून सरासरी २० किलो कापसाची वेचणी होते. त्याचा विचार करता कापूस वेचणीचा दर १५ रुपये किलोपेक्षा अधिक होतो. परिणामी, शेतकऱ्यांना दिवसाची मजुरी चुकविणेदेखील खर्चिक ठरत आहे.


Share to ....: 21    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 40264840

Saying...........





Cotton Group